शेअर ट्रेडिंगच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडून दीड कोटीची फसवणूक
शेअर ट्रेडिंगच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडून दीड कोटीची फसवणूक
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विविध व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून संपर्क साधत एका तरुणासह तक्रारदारास शेअर ट्रेडिंगच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडून एका अज्ञात इसमाने सुमारे दीड कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित आरोपीने फिर्यादी व इतर तक्रारदार यांना शेअर ट्रेडिंगच्या विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींद्वारे विविध व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून संपर्क साधला. त्यानंतर बनावट शेअर कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास त्यांना भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी व तक्रारदारांना आरोपीने स्टॉकबद्दल वेळोवेळी माहिती देऊन त्याच्या कंपनीच्या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते ओपन करण्यास सांगितले. त्यानुसार नमूद अ‍ॅपवर विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्याकरिता गेलेल्या विविध बँकांच्या खात्यांवर एकूण 44 लाख 95 हजार रुपये आयसीआयसीआय बँकेतून भरण्यास भाग पाडले.

त्यातून एकूण 5 लाख 48 हजार 500 रुपये प्राप्त झाले व उर्वरित 39 लाख 46 हजार 500 रुपये न देता फिर्यादी व इतर तक्रारदार यांची 93 लाख 34 हजार 379 रुपये अशी एकूण 1 कोटी 32 लाख 80 हजार 879 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 22 मार्च ते 31 जुलै 2024 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला.

आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात घेता फिर्यादी व तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group