धारदार शस्त्राचा धाक दाखवून मेनरोडच्या व्यापार्‍याची रोकड लंपास
धारदार शस्त्राचा धाक दाखवून मेनरोडच्या व्यापार्‍याची रोकड लंपास
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दुकान वाढवून घरी जात असताना धारदार शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍याच्या खिशातील रोकड व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी महेश अरविंद चौधरी (वय 43, रा. अभ्युदय कॉलनी, गंगापूर रोड) हे दि. 15 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे दुकान वाढवून घरी जात होते. रात्री 9.40 वाजेच्या सुमारास ते गोळे कॉलनीजवळ आले असता तीन अनोळखी इसम अ‍ॅक्टिव्हावरून त्यांच्या पाठीमागे आले. त्यांनी चौधरींना लाथ मारून खाली पाडले.

नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याजवळील बॅग हिसकावून नेली. या बॅगेमध्ये दहा हजार रुपये रोख व सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल होता. घटना घडल्यानंतर चौधरी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group