उपनगरला महिलेकडून २.५० किलो गांजा जप्त
उपनगरला महिलेकडून २.५० किलो गांजा जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ अडीच किलोचा गांजा बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई करून तिला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी जैरुन्निसा हजरत मन्सुरी (वय 43, रा. मालधक्का रोड, देवळाली गाव, नाशिकरोड) ही महिला काल (दि. 28) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उपनगर येथे संघमित्रा सोसायटीसमोर 2.50 किलोग्रॅम गांजा बाळगताना मिळून आली.

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिच्या ताब्यातून 2.050 किलोग्रॅम गांजा, 500 रुपये किमतीचा छोटा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, छोट्या प्लास्टिक पिशव्या, स्टॅपलर व त्याच्या पिना असा 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या महिलेविरुद्ध एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी उपनगर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group