खा. राजाभाऊ वाजे यांना मातृशोक
खा. राजाभाऊ वाजे यांना मातृशोक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सिन्नरचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार प्रकाश वाजे यांच्या पत्नी व नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी वाजे (वय 81) यांचे सिन्नर येथील निवासस्थानी सकाळी ९.३५ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.30) दुपारी 4 वाजता संगमनेर नाका, सिन्नर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 त्यांच्या पश्चात पती प्रकाश वाजे, मुलगा खा. राजाभाऊ वाजे, सून, नातवंडे असा परिवार आहे. निधनाचे वृत्त समजताच वाजे यांच्या सांत्वनासाठी सिन्नर येथील निवासस्थानी गर्दी झाली आहे. वाजे परिवाराच्या दु:खात भ्रमर परिवार सहभागी आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group