नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या चार चाकी वाहनाने नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर अचानक पेट घेतला. यावेळी वाहनात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
नाशिक पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी योगेश वाजे (रा. जत्रा हॉटेल जवळ, नाशिक) हे आज संध्याकाळी कामावरून सुटल्या नंतर मुबंई हुन रेल्वेने येणाऱ्या पत्नी ला घेण्यासाठी नाशिकरोड कडे आपल्या इटीवोस गाडी क्र.MH 15EP 4743 आले. रेल्वे गाडी ला येण्यास उशीर असल्याने वाजे हे नाशिकरोड पोलीस ठाण्याबाहेर गाडी लावून सहकारी पोलीस मित्रांना भेटण्यासाठी गेले.
काही वेळात या गाडीच्या बोनेट मधून धूर व काही वेळात आग बाहेर येऊ लागली. तात्काळ पदचारी व पोलिसांनी अग्निशमन दलाला कळवल्या नंतर एका बंबा ने आग आटोक्यात आणली. पोलीस ठाण्याबाहेर गाडी ला आग लागल्याने रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.