Nashik : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने महिलेला मिठी मारत केला विनयभंग
Nashik : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने महिलेला मिठी मारत केला विनयभंग
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ऑफिसमधील कपाटात सेवापुस्तक शोधत असताना पाठीमागून आलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने महिला कर्मचाऱ्याला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार काल (दि. 28) सकाळी पंचायत समितीच्या कार्यालयात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास पीडित महिला ही नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात कर्तव्यावर होती. त्यावेळी कार्यालयातील क्लर्क यांच्या सांगण्यावरून तेथे हजर असलेले आरोपी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय वसंत वरखेडे यांचे सेवापुस्तक कार्यालयातील कपाटात शोधत होत्या.

त्यावेळी आरोपी मुख्याध्यापकाने या महिला कर्मचाऱ्यास पाठीमागून मिठी मारून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. 

या प्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय वरखेडे याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group