नाशिक : संभाजी ब्रिगेडच्या वतीने बदलापूर सह देशात झालेल्या विविध महिला अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने सीबीएस जवळील आंबेडकर पुतळा येथे बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर भगिनीवर झालेले अन्याय अत्याचार व बलात्कार, मणिपूर येथे माता भगिनीची काढलेली नग्नधिंड या सर्व घटनांचा तीव्र निषेध म्हणून निदर्शने व आंदोलन करण्यात आले .
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर झळकावून निषेध व्यक्त करण्यात आला . तसेच बदलापूर येथील घटनेतील अक्षय शिंदे याच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करून पोस्टर्स फाडण्यात आले . अमानवीय अमानुष कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला जरब बसणे गरजेचे असून केस फास्टट्रॅक वर चालून अशी भूमिका संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आली.भगिनी वर अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रज्ञा टुपके जेऊघाले , मंदा दोडके हिरामण वाघ, अनिल आहेर ,नितीन रोटे पाटील, करण गायकर ,
सचिन पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख शरद लबडे , प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, मंदार धिवरे, बळीराम घडवजे, नितीन काळे , महादू नाटे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.