मावशीचा पती.. ,प्रेम प्रकरण आणि तरुणीची हत्या ! नेमकं काय घडलं ?
मावशीचा पती.. ,प्रेम प्रकरण आणि तरुणीची हत्या ! नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
प्रेम प्रकरणातून  एका 22 वर्षीय तरूणीची हत्या झाल्याची घटना कोतवाली शहरात घडली आहे . मात्र हत्येमागचं कारण घरच्यांना समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला. स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता असं काही भयंकर घडेल. मावशीच्या पतीसोबत तरूणीचे दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र असं काय झालं की त्याने तिची हत्याच केली . 

या विषयी अधिक माहिती अशी की , मृत तरूणी वडिलांसोबत कोतवाली शहरातील शुगर मिल कॉलनीत आपल्या मावशीच्या घरी आली होती. मुलीला मावशीकडे सोडून वडील गावी गेले. 21 ऑगस्ट रोजी मावशीच्या पतीने तिला घरापासून थोडे दूर बोलावलं. दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण तरूणीचे विवाह ठरला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला, हा वाद टोकाला गेला की त्याने रागाच्या भरात गळा दाबून तिची हत्या केली.

आरोपीने आपला गुन्हा लपवण्यासाठी तरूणीचा मृतदेह एक बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी फेकून दिला. मुलीच्या घरी फोन करत सांगितले की, ती पळून गेलीये. आरोपीने कोणालाही संशय येऊ नये, यामुळे मुलीचा मोबाईल हा चालत्या बसमधून फेकून दिला. मुलगी पळून गेल्याचे सांगितल्यानंतर तिच्या वडिलांना संशय आला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मेहुणीचा पती मणिकांत द्विवेदी याच्या विरोधात एफआयआर दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यावर त्याने आपला गुन्हा कबुल केला. पण तरूणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते हे ऐकल्यावर घरच्यांनाही धक्का बसला. कारण 22 वर्षीय तरूणीच्या मावशीच्यास पतीचे वय 45 होते. त्यामुळे घरातील प्रत्येकासाठी धक्का देणारं होतं. ही घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे घडली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group