धक्कादायक : देवळाली गावात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या
धक्कादायक : देवळाली गावात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील देवळालीगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला असून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने छेड काढणाऱ्या युवकाच्या व त्याच्या कुटूंबियातील व्यक्तींना कंटाळून आत्महत्या केली आहे.याबाबत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, देवळाली गाव येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयात शिकत होती. रस्त्याने येता जाता गुलाबवाडी येथील कलाम इजहार मन्सूरी (वय 22) हा युवक तिची छेड काढीत लग्न करण्याचा आग्रह करीत होता. त्याचे कुटूंबातील काही लोक देखील कलाम बरोबर लग्न करण्यासाठी त्या मुलीकडे तगादा लावत होते.

या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विहितगांव येथील पुलावर विषारी औषध सेवन केलेले असताना अंजुम सय्यद, साहिल सय्यद यांनी तुमची मुलगी चक्कर येऊन पडली असल्याचे खोटे सांगितले. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले.

अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून युवक कलाम, त्याची आई व इतर नातेवाईका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group