चुंचाळेत अज्ञातांनी तीन दुचाकी जाळल्या
चुंचाळेत अज्ञातांनी तीन दुचाकी जाळल्या
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  अज्ञात कारणातून अज्ञात समाजकंटकाने घराजवळ उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली जाळून नुकसान केल्याचा प्रकार चुंचाळे येथे घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दिनकर तुकाराम अवचार (रा. घरकुल योजना, चुंचाळे, अंबड) यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर असलेली एमएच 15 जेजे 2463 या क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा मोपेड मोटारसायकल घराजवळ उभी केली होती, तसेच त्यांच्या मोटारसायकलीशेजारी एमएच 15 बीएस 3188 या क्रमांकाची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल व एमएच 15 सीडब्ल्यू 6509 या क्रमांकाची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल अशा तीन मोटारसायकली उभ्या होत्या.

दि. 22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात इसमांनी अज्ञात कारणातून या तीनही वाहनांच्या सीटवर काही तरी ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना आग लावली. या आगीमध्ये तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group