इगतपुरी - बोरीची वाडी, पिंपळगाव मोर ता. इगतपुरी येथील ३२ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह वासाळी परिसरातील जंगलात आढळून आला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याबाबत घोटी पोलिसांना खबर देण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून ह्या महिलेचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजेपासून तिचा मृतदेह पंचनामाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.
qमृतदेहाची अवस्था खराब असल्याने वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी बोलावण्यात आले असून अद्याप ते न आल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित घटनेत ५ संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित आहेत. झूणकाबाई दशरथ भले वय ३२ असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
तातडीने मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून संबंधितांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.