नाशिकमध्ये घडले महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे दर्शन
नाशिकमध्ये घडले महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे दर्शन
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (चंद्रशेखर गोसावी) - आदिवासी बांधवांच्या मोर्चामध्ये पोलिसांच्या माणुसकीचे आज दर्शन घडले.

ज्यावेळी एका मोर्चेकरी महिलेला अस्वस्थ वाटू लागले आणि ती खाली पडणार अशी परिस्थिती होती त्यावेळी महिला पोलीस धावून आली आणि तिने थेट आपल्या खांद्यावर उचलून या महिलेला रुग्णालयात दाखल केले. या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आज नाशिकमध्ये माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंचवटीतील तपोवनापासुन गडकरी चौकातील आदिवासी आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आदिवासी महिलेला मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या कार्यालयाजवळ पोहोचला त्यावेळी अचानक एका महिलेची तब्येत बिघडली. ती महिला या ठिकाणी चक्कर येऊन पडणार त्यावेळेस पोलीस महिला कर्मचाऱ्यांमधील माणुसकी पाहायला मिळाली आणि तातडीने या महिलेच्या मदतीसाठी बंदोबस्ताला असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस हवालदार योगिता फसाळे, महिला होमगार्ड पगारे तातडीने धावून गेल्या.

यातील महिला पोलिस अधिकारी मनीषा सोनवणे यांनी तातडीने या अस्वस्थ वाटणाऱ्या महिला मोर्चेकऱ्याला थेट आपल्या खांद्यावर उचलून पोलीस व्हॅन मध्ये टाकले आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाची थाप दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group