नाशिक - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023-24 अंतर्गत महाराष्ट्रातून आदर्श कलाध्यापक राज्य पुरस्कार श्री डी डी बिटको बॉईज हायस्कूल व जुनिअर कॉलेज नाशिक येथील कलाध्यापक राजेश भीमराज सावंत यांना नुकताच शासनाने जाहीर केला आहे.
एक लाख दहा हजार रुपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून हा राज्य पुरस्कार येत्या 5 सप्टेंबरला मुंबई येथील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर इतर मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय कार्यक्रमात हा सन्मान दिला जाणार आहे.
राजेश सावंत यांना प्राप्त होणारा हा राज्य पुरस्कारचा हा शासकीय सन्मान त्यांच्यासह त्यांची संस्था, शाळा व तमाम नाशिककरांचा शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक बहुमान वाढवणारा आहे.