आता नाशिकमध्ये खासगी क्लासचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
आता नाशिकमध्ये खासगी क्लासचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
img
दैनिक भ्रमर


नाशिक :  बदलापूरमध्ये शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना नाशिकमध्ये संतापजनक घटना घडली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता पाचवीत असलेल्या अल्पवयीन मुलीस एका खासगी क्लासचालकाने ती एकटी असल्याची संधी साधत तिचा विनयभंग केला.

शिक्षकाने अंगलट येऊन अश्लील कृत्य केले. इतर विद्यार्थी आलेले नसताना अल्पवयीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत मागून अंगलट करून स्त्री मानस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी अंबड पोलिसांनी क्लासचालक संशयित कृष्णा योगेश दहिभाते यास अटक केली आहे. सिडकोतील उपेंद्र नगर भागात संशयित कृष्णा दहिभाते यांचा ज्ञानेश्वरी क्लासेस नावाने खासगी क्लास आहे.

येथे संशयित कृष्णा दहिभाते हा मुलांना विज्ञान व इंग्रजी विषय शिकवतो, तर त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकवते. या क्लासमध्ये अल्पवयीन पीडित मुलगी गुरुवारी नेहमीप्रमाणे क्लासला गेली. तेव्हा हा सर्व प्रकार घडला.

असा उघड झाला प्रकार
दहिभातेने तिचा विनयभंग केल्यानंतर तिला याबाबत घरी सांगू नको, नाहीतर मी तुझीच तक्रार करेल असा दम भरला. मुलगी क्लासमधून घरी आल्यापासून घाबरलेली असल्याने शांतच बसली होती.

आईला काहीतरी घडल्याची शंका आल्याने मुलीला विचारला काय झाले ते. तेव्हा ती म्हणू लागले की मी उद्यापासून क्लासला जाणार नाही. त्यांनी तिला विश्वासात घेत काय झाले हे जाणून घेतले तेव्हा दहिभातेचा हा प्रताप तिने सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group