NASHIK : खोटे, बनावट दस्त तयार करून भागीदार भावाची फसवणूक
NASHIK : खोटे, बनावट दस्त तयार करून भागीदार भावाची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्वत:च्या फायद्यासाठी खोटे व बनावट दस्त तयार करून त्याआधारे बांधकाम प्रकल्प पूर्ण करून भागीदार असलेल्या भावाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नितीन सदाशिव शुक्ल (वय 45, रा. शुक्ल लेन, सराफ बाजाराशेजारी, नाशिक) यांच्या वडिलांचे दि. 2 मे 2021 रोजी कोरोनामुळे निधन झाले असून, त्यांनी व त्यांचे भागीदार आरोपी दिलीप शुक्ल यांनी सन 1992 मध्ये चांदवडकर लेनमध्ये मे. डील कन्स्ट्रक्शन ही भागीदारी फर्म स्थापन केली. या फर्ममध्ये फिर्यादी नितीन शुक्ल व त्यांचा भाऊ कौस्तुभ शुक्ल असे दोघे जण कायदेशीर वारस असल्याचे, तसेच या फर्ममध्ये नितीन शुक्ल यांच्या वडिलांचा हिस्सा होता.

तो मिळविण्याबाबत सन 2015 मध्ये मृत्युपत्राचा दस्तऐवज नोंदविलेला होता; मात्र दिलीप शुक्ल व सौरभ शुक्ल यांनी संगनमताने फौजदारीपात्र कट करून फिर्यादी नितीन शुक्ल व कौस्तुभ शुक्ल यांचे कायदेशीर वारस हक्क डावलण्याकरिता पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या मे. डील कन्स्ट्रक्शन या भागीदारी फर्मचे दि. 17 मे 2024 रोजी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजाच्या आधारे नव्याने मे. डील कन्स्ट्रक्शन्स या नावाने दस्त करून भागीदारी फर्मचे अस्तित्व बदलले.

पूर्वी अस्तित्वात असलेल्या मूळ मेसर्स डील कन्स्ट्रक्शनच्या नावाने फिर्यादी नितीन शुक्ल यांचे वडील हयात असताना मनपा हद्दीतील मौजे अंबड खुर्द या गाव शिवारामधील गट नंबर 227/अ/2/1 यापैकी प्लॉट नंबर 1 यांसी क्षेत्र 852/37 चौ. मी. या मिळकतीवर सुरू असलेला प्रोजेक्ट नव्याने अस्तित्वात आलेल्या भागीदारी फर्मच्या नावाने सतत चालू ठेवून आरोपींनी स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्याकरिता फिर्यादी व त्याच्या भावाचे नुकसान होण्याकरिता हे दस्तऐवज स्वत:च्या लाभात करून घेतलेले असून, हेतुपुरस्सर खोटे व बनावट दस्त तयार करून हा प्रकल्प तयार केला, तसेच नितीन शुक्ल व कौस्तुभ शुक्ल यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group