२२ ऑगस्ट २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणार्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिलेशी आरोपी तरुणाने मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. आरोपी तरुणाने पीडितेस आपला साखरपुडा झाला आहे. आपण पती-पत्नी आहोत, असे म्हणून त्याच्या राहत्या घरी व वेगवेगळ्या हॉटेलमध्ये व लॉजवर नेऊन तिला भावनिक नाते निर्माण केले.
त्यानंतर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध पीडितेशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले; मात्र काही दिवसांनी लग्नास नकार दिला. पीडित व तरुण हे दोघेही एकमेकांशी परिचित असून, त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचा काही दिवसांनी साखरपुडाही झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखवून त्याला अटक करण्यात आली आहे.
Copyright ©2025 Bhramar