सातपूर :- श्रमिकनगर येथील सातमाऊली चौक येथे घराजवळ गेलेल्या उच्च दाबाच्या विज तारेला चिटकून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. याबाबत सातपूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मंगेश राणे (वय २१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगेश राणे यांच्या घरावरून उच्च दाबाची विद्युत तार गेली होती. मंगेश राणे हा घराचे बांधकाम चालू असल्याने काही कामानिमित्त वर गेला असता तो मुख्य तारेला चिकटला.
या घटनेत तो गंभीररीत्या भाजला गेला. त्यास नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत्यू घोषित केले.