गुप्त विद्येसाठी वापरण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या वस्तू तस्करांकडून जप्त
गुप्त विद्येसाठी वापरण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या वस्तू तस्करांकडून जप्त
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- नाशिकमध्ये डीआरआयने छापा टाकून तस्करांकडून तांत्रिक मंत्र्यांकडून उपयोग होणाऱ्या वस्तू विकण्यासाठी आलेल्या टोळीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सुमारे 33 लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. यावेळी या तस्करांनी डीआरआयच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना देखील झाली आहे.

याबाबत डीआरआय सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेतकऱ्यांची एक टोळी बंगाल मॉनिटर लिझार्ड हेमिपेनेस (“हाथा जोडी”) आणि 19.6 किलो सॉफ्ट कोरल (“इंद्रजाल”) हे विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे ही माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या विभागाने एक पथक तयार करून ते या तस्करांच्या माहितीसाठी पाठवले.

या तस्करांशी संपर्क साधून अतिशय सावध पद्धतीने डीआरआयच्या या पथकाने तस्करांना माल विकत घेण्यासाठी संपर्क साधून त्यांना नांदगाव रेल्वे स्टेशनवर बोलवले होते. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनवर हे पथक असताना सावध होते परंतु तस्करांनी मात्र या पथकाला चकवा दिला आणि काही काळ थांबण्यासाठी सांगितले.

त्यानंतर पुन्हा एकदा तपास करण्यासाठी आलेल्या पथकाने तस्करांशी संपर्क साधला आणि त्यांना कुठे येऊ असे विचारले असता त्यांनी नांदगाव तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र असलेल्या भागांमध्ये बोलवले आणि त्या ठिकाणी जाण्यापूर्वी डीआरआयच्या पथकाने आपल्या काही कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून त्यांना टू व्हीलरवर या परिसरामध्ये गस्त घालण्यास सांगितले.

अन्य अधिकारी आणि कर्मचारी फोर व्हीलरवर आंबेडकर जयंतीचे झेंडे लावून या दुर्गम भागात पोहोचले आणि त्या ठिकाणी तस्करांनी माल विकत घेण्यासाठी आलेल्या पथकाने जेवणाची व्यवस्था करत असल्याची ऑफर दिली आणि त्याच ठिकाणी हा व्यवहार पूर्ण होत असताना तस्करांना संशय आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणावरून पळण्याचा प्रयत्न केला.

आज सकाळी ही सर्व घटना घडत असताना डीआरआयच्या पथकाने देखील तस्करांचा पाठलाग करून तीन जणांना अटक केली. या तस्करांनी अटक होऊ नये म्हणून शासनाच्या या पथकावर दगडफेक केली. तरीदेखील डीआरआयचं हे पथक न थांबता डीआरआयच्या पथकाने पाठलाग करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बंगाल मॉनिटर लिझार्ड हेमिपेनेस (“हाथा जोडी”) आणि 19.6 किलो सॉफ्ट कोरल (“इंद्रजाल”) असा माल हस्तगत केला असून त्याची किंमत बाजारामध्ये सुमारे 33 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group