ओळखीच्या युवकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
ओळखीच्या युवकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करुन तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचारातून गर्भवती झालेल्या पिडीतेने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी ! ठाकरेंचा भाजपला दे धक्का…भाजपचे 'ते' नाराज खासदार हाती शिवबंधन बांधणार?

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेची पिडीत मुलगी ही 16 वर्षांची असून ती अल्पवयीन आहे. दरम्यान आरोपी रोहित गणपत कडाळे (वय 20, रा. शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डीरोड) याने या मुलीशी 4 वर्षांपूर्वी ओळख निर्माण करुन तिच्याशी मैत्री केली.

त्यानंतर कडाळे याने फेब्रुवारी 2023 ते 29 मार्च 2024 या कालावधीत पिडीत मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन रविवार कारंजा येथून स्वत:च्या मोटारसायकलीने पांडवलेणे येथे वेळोवेळी घेऊन जाऊन तेथे असलेल्या तितली गार्डनमध्ये तिच्यासोबत वारंवार लैंगिक अत्याचार केले. यातून ही मुलगी गर्भवती झाली व तिने एका स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. 

दीड लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक व दोन हवालदार जाळ्यात

ही बाब लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने प्रथम मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रोहित कडाळे याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली असून, हा गुन्हा नंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group