दीड लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक व दोन हवालदार जाळ्यात
दीड लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक व दोन हवालदार जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : तक्रारदारावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह दोन हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे (रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड), पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे) व अशोक साहेबराव पाटील (वय 45, रा. प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) अशी लाच घेणाऱ्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली व ती रक्कम पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही हवालदारांशी चर्चा केल्यानंतर तडजोडीअंती दीड लाख रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी सापळा रचला असता लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी व उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस नाईक संतोष पावरा, पोलीस शिपाई रामदास बारेला, चालक बडगुजर यांनी केली.

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group