मोठी बातमी ! ठाकरेंचा भाजपला दे धक्का…भाजपचे  'ते' नाराज खासदार हाती शिवबंधन बांधणार?
मोठी बातमी ! ठाकरेंचा भाजपला दे धक्का…भाजपचे 'ते' नाराज खासदार हाती शिवबंधन बांधणार?
img
Dipali Ghadwaje
देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उन्मेष पाटील नाराज असून त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक झाली. जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याने पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात ते आणि त्यांच्या पत्नी प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात उन्मेष पाटील यांनी आधी संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आता उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात करणार का? जळगावातून उमेश पाटील यांनी स्मिता वाघ यांच्या विरोधात उमेदवारी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group