पाईपलाईनरोड वरील युवकाच्या मारेकऱ्यांना
पाईपलाईनरोड वरील युवकाच्या मारेकऱ्यांना "या" तारखेपर्यंत पोलीस कोठडी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पाईपलाईनरोड वरील युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिसांना यश आले. सातपूरमध्ये नेपाळी युवकाच्या खूनामागे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले. तपासा दरम्यान हॉटेलमध्ये एकत्र काम करणार्‍या मित्रानेच हा खून केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले.

तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, मयत महेंद्र सार्की हा नेपाळमधील एका मुलीच्या संपर्कात होता. त्याचा मित्र ईश्वर याच्यासमोर तो तासनतास तिच्याशी फोनवर गप्पा मारायचा. हे ईश्वरला खटकायचे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री मयत हा त्या तरुणीशी रात्री 2.30 वाजता गच्चीवर उभा राहून मोबाइलवर बोलत होता तेव्हा ईश्वरने आपल्या साथीदारा समवेत त्याचा गळा चिरून त्याला खाली फेकून दिले होते व त्याने आत्महत्या केल्याचे भासवले.

तपासानंतर सातपूर पोलिसांनी ईश्वर व प्रकाश या दोन्ही आरोपींना काल रात्री सातपूर परिसरातून अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group