वैभव देवरेने 20 लाख रुपये देऊन हडपली 3 कोटींची मालमत्ता
वैभव देवरेने 20 लाख रुपये देऊन हडपली 3 कोटींची मालमत्ता
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- खासगी सावकारीतून कोट्यवधी रुपयांची माया जमावणाऱ्या वैभव देवरेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याच्यावर 5वा गुन्हा दाखल झाला आहे. 

जगन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी सन 2018 मध्ये वैभव देवरे कडून 20 लाख रुपये व्याजाने घेतले होते. दर महा 10 टक्के व्याज देण्याचे ठरले होते. सुरुवातीला 2-3 महिने त्यांनी व्याजाचे पैसे देवरेला दिले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना पुढील व्याज देणे शक्य झाले नाही.

वैभवने पैशांचा तगादा सुरुच ठेवला. देवरेने दुप्पट पैसे मागण्यास सुरुवात केली. तेव्हा पाटील यांनी त्यांचे कार्यालय त्याच्या नावावर केले. देवरेने नंतर राजसारथी सोसायटी मधील घरही लाटले. कालांतराने त्याने पाटील यांना बंगला विकण्यास भाग पाडून त्यातून काही पैसे घेऊन टाकले. पैसे दिले नाहीत तर जीवे ठार मारण्याची धमकीही तो द्यायचा.

हळू हळू करत देवरेने पाटील यांच्याकडून 20 लाखांच्या बदल्यात जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता व रोख रक्कम असे सुमारे 3 कोटी रुपये उकळले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वैभव देवरे सह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group