Nashik : बालविवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार; संशय घेत केली मारहाण
Nashik : बालविवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार; संशय घेत केली मारहाण
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बालविवाह लावून देत पीडितेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही आरोपी वंदना राधाकिसन मगर, राधाकिसन दादाराव मगर (दोघेही रा. गंजमाळ, जुने नाशिक) व पांडुरंग पंडित शिंदे (रा. मु. पो. कावी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी संगनमत करून पीडितेच्या संमतीशिवाय तिचा विवाह लावून दिला.

विवाहानंतर आरोपी पांडुरंग शिंदे याने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. हा प्रकार दि. 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होता. अखेर या छळाला कंटाळून अल्पवयीन पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात लैंगिक छळाची फिर्याद दिली असून, हा गुन्हा जालना जिल्ह्यातील शिवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group