Nashik Crime : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून
Nashik Crime : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यात लोखंडी बत्ता किंवा तत्सम वस्तूने प्रहार करून तिचा खून करून तिचा मृतदेह घराच्या खोल खड्ड्यात फेकून दिल्याप्रकरणी मयत महिलेचा पती आधार हरचंद माळी (वय ३५, रा. केरसाणे, ता. सटाणा) यास सटाणा पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी गवंडीकाम करणारे आनंदा पंडित सोनवणे (वय ४८, मूळ रा. केरसाणे, सध्या रा. चौंधाणे) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीनुसार मयत सरला आधार माळी आणि आधार हरचंद माळी हे पत्नी-पत्नी असून, नानाजी अहिरे यांच्या दसाने शिवारातील शेतातील घरात राहून केरसाणे परिसरात मोलमजुरी करीत होते.

आधार हा वेळोवेळी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीचे भांडण झाले. यावर रागाच्या भरात आधार माळी याने स्वयंपाकघरात जाऊन चुलीशेजारी असलेल्या मुसळीसारख्या लोखंडी वस्तूने पत्नीच्या डोक्यात प्रहार केले. या भांडणात पत्नी सरला मरण पावली.

पत्नी मरण पावल्याचे लक्षात येताच घराच्या खोल खड्ड्यात तिचा मृतदेह फेकून देऊन पत्नी कुठे तरी निघून गेल्याचा बनाव केला; मात्र पोलीस तपासात त्याचे राक्षसी कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी पती आधार याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०२ व २०१ नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group