Nashik Crime : विषारी पदार्थ देऊन सवतीच्या 14 महिन्याच्या मुलाची हत्या
Nashik Crime : विषारी पदार्थ देऊन सवतीच्या 14 महिन्याच्या मुलाची हत्या
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अवघ्या 14 महिने वयाच्या मुलास काही तरी विषारी पदार्थ दिल्याने त्यास विषबाधा होऊन त्याचे अखेर निधन झाले.

या प्रकरणी फिर्यादी नसीम उसेहर रिहान अहमद (वय 29, रा. गल्ली नंबर 5, नयापुरा, मालेगाव) हिने तिची सवत महेरिन अब्दुल मलिक (रा. गल्ली नंबर 1, नयापुरा, मालेगाव) हिच्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. मालेगाव येथील आझादनगर पोलिसांनी भा. दं. वि. कलम 302 अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नसीमने नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नसीम व महेरिन या दोघी सवती आहेत. गेल्या दि. 23 मार्च रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादीचा मुलगा अरसलान रिहान अहमद (वय 14 महिने) यास फिर्यादीच्या नणंदेचा मुलगा महंमद अमार याने महेरिन अब्दुल मलिक या सवतीच्या घरी नेले होते. नसीम ही सवतीला आपल्या घरात येऊ देत नव्हती. यावरून राग धरून सवतीने अरसलान यास यावेळी काही तरी विषारी औषध दिले, असा संशय फिर्यादी नसीम हिने व्यक्त केला आहे.

अरसलानची तब्येत बिघडल्यामुळे त्यास प्रथम मालेगाव व नंतर नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र त्याचे अखेर निधन झाले. यामुळे पोलिसांनी आरोपी महेरिन अब्दुल मलिक या सवतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पी. एन. बहुरे हे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group