Nashik : कोणार्कनगरला विवाहितेची आत्महत्या; दोन चिमुकल्यांची विष पाजून हत्या?
Nashik : कोणार्कनगरला विवाहितेची आत्महत्या; दोन चिमुकल्यांची विष पाजून हत्या?
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आडगाव शिवारातील कोणार्कनगर भागात एका विवाहितेने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आत्महत्येआधी विवाहितेची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळल्याने त्यांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अश्विनी निकुंभ या विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरुन चौथ्या मजल्यावरून आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तिने घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्र्तवला. पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना विवाहितेची 7 वर्षीय व 2 वर्षीय या दोन्ही मुली मृत अवस्थेत आढळून आल्या. दोघींना विष पाजून त्यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

शवविच्छेदनानंतर हे उघडकीस येईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  अश्विनी निकुंभ यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करीत असून, अधिक माहिती घेतली जात आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group