Nashik : महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार, वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा
Nashik : महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार, वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महिलेला लग्नाचे आमिष दाखवून इमोशनल ब्लॅकमेल करून तिच्या इच्छेविरुद्ध चार वर्षे लैंगिक अत्याचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला ही नाशिकमध्ये राहते. आरोपी किरण रमाकांत मडकर (वय 35, रा. संकल्प निवास, टिळक रोड, मु. पो. ता. जि. अहमदनगर) हा वैद्यकीय अधिकारी आहे. त्याने पीडित महिलेशी ओळख निर्माण तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखविले.

काही दिवसांनी आरोपी मडकर याने या महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत लग्नास नकार दिला. हा प्रकार दि. 28 जुलै 2017 ते सन 2021 पर्यंत आडगाव शिवारातील घरी घडला.

लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल केले, तसेच लग्नास नकार दिला म्हणून आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी किरण मडकर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group