Nashik : पाईपलाईन रोडवरील खुनाचा उलगडा;
Nashik : पाईपलाईन रोडवरील खुनाचा उलगडा; "हे" कारण आले समोर
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पाईपलाईन रोड वरील युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे.  सातपूरमध्ये नेपाळी युवकाच्या खूनामागे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले असून हॉटेलमध्ये एकत्र काम करणार्‍या मित्रानेच हा खून केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सातपूरच्या पाईपलाईन रोडवर कौशल्य व्हिला येथे राहणारा युवक महेंद्र प्रकाश सार्की (वय २२) याचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनी तपासकामी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांना मार्गदर्शन केले.

तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, मयत महेंद्र सार्की हा नेपाळमधील एका मुलीच्या संपर्कात होता. त्याचा मित्र ईश्वर याच्यासमोर तो तासनतास तिच्याशी फोनवर गप्पा मारायचा. हे ईश्वरला खटकायचे. ईश्वरने तिला मेसेज करुन तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र महेंद्र आपल्यासमोर मुद्दाम बोलत असल्याने त्याच्या मनात महेंद्रविषयी राग होता.

ईश्वरने त्याचा साथीदार प्रकाश सेठी याच्या मदतीने त्याचा काटा काढायचे ठरवले. अखेर त्याने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करुन त्याला ठार मारले. सातपूर पोलिसांनी ईश्वर व प्रकाश या दोन्ही आरोपींना  काल रात्री  टक केली असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group