नरेश कारडा यांच्यासह इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
नरेश कारडा यांच्यासह इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर

नाशिक :  नरेश कारडा यांच्यासह काही जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निवृत्त कर्नल राकेश कालिया यांनी हरि नक्षत्र हाऊसिंग प्रोजेक्टच्या फेज 1 मध्ये फ्लॅट बुक केला होता. संशयित नरेश कारडा, अनुप कटारिया व इतरांनी बुकिंग केलेल्या फ्लॅटच्या बदल्यात कालिया यांच्याकडून 30 लाख रुपये चेकद्वारे घेऊन त्यांना ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवले.

काही महिने त्यांनी कालिया यांना परतावा दिला मात्र, नंतर त्यांनी परतावा देण्याचे बंद केले. त्याचबरोबर कालिया यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फ्लॅटचा ताबा ही स्वतः कडेच ठेवला.

हा सर्व प्रकार 6 फेब्रुवारी 2019 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत घडला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कर्नल राकेश कालिया यांनी नरेश कारडा, अनुप कटारिया व इतरांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात वरील अर्थाची फसवणुक झाल्याची फिर्याद दाखल केली.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group