क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर पोलिसांची धाड साडेसोळा लाखांचा ऐवज जप्त
क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर पोलिसांची धाड साडेसोळा लाखांचा ऐवज जप्त
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :  गंगापूर रोडवर कृषीनगर जॉगिंग ट्रॅकसमोरील रोडवर एका कारमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेतली जात आहे, असे समजल्यावरून गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत एका इसमास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रोकड, फोरव्हीलर व इतर असा 16 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जॉगिंग ट्रॅकसमोरील जानकी हाईट्स बिल्डिंगशेजारील रस्त्यावर एमएच 15 जेएच 3068 या क्रमांकाच्या कारमध्ये बसून एक इसम क्रिकेट बेटिंग घेताना आढळला.

त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव महेंद्र अशोक वैष्णव (वय 34, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, लामखडे मळा, तारवालानगर) असे असून, त्याने आयपीएल क्रिकेट मॅचमध्ये कोलकाता विरुद्ध नवी दिल्ली या क्रिकेट सामन्याचे मोबाईलवर प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहून या खेळावर ऑनलाईन बेटिंग घेत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम व चारचाकी गाडी असा 16 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील विशेष पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाल, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, पोलीस नाईक दत्तात्रय चकोर, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, अंमलदार चारुदत्त निकम, अनिरुद्ध येवले, योगेश सानप, भगवान जाधव, सुनील कोल्हे, गणेश वडजे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group