गंगापूर रोडवर हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल
गंगापूर रोडवर हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर


हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा गंगापूर पोलीसांनी उदध्वस्त केला. 

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांदे्र यांनी फिर्याद दिली आहे. सावरगावरोडवरील बरॅको हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास छापा टाकला. हॉटेलचे मॅनेजर प्रशांत देवेंद्र खिल्लर (वय ३०), वेटर राहूल रमेश साळवे (वय २१) हे सावरगाव रोडवरील बराको हॉटेल मध्ये स्मोकिंग झोन नसलेल्या ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवत होते. 

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा साहिल जिभाऊ सोनवणे (रा.सटाणा), प्रतिक रमेश आहेर ,आशितोष रोजश पगारे, शुभम सुनिल पवार (तिघे रा. शिवशक्तीनगर जेलरोड), विशाल रमेश देशपांडे (रा.काळेनगर,गंगापूररोड), विशाल विजय व्हिजन (रा.बळवंतनगर,गंगापूररोड), निखील सुभाष पाटील (रा.नवीन पंडीत कॉलनी,),संदिप दिनेश खंडेलवाल (रा.विकास कॉलनी,त्र्यंबकरोड) व पुरूषोत्तम इश्वरदास उबराणी (रा.रामेश्वरनगर गंगापूररोड) हे हॉटेलमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आले. 

या ठिकाणाहून हुक्का पॉट व वेगवेगळया फ्लेवरची तंबाखू असा सुमारे १० हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रविंद्र मोहिते करीत आहेत. याप्रकरणी ११ जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group