"त्या" युवकाच्या खून प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- काल रात्री सनी जॉन या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. त्या खुनातील आरोपींपैकी 2 आरोपींना पंचवटी पोलिसांनी 24 तासांच्या आत ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सनी जॉन हा काल रात्री11.30 वाजेच्या सुमारास त्याचे मित्र श्रेयस म्हस्के, सागर सोनवणे, अनिकेत सरोदे, रवी चव्हाण, अमोल चव्हाण यांच्या सोबत बसलेला होता. तेव्हा आरोपी योगेश साळी, दादू पेखळे, यश भागवत, मयूर पठाडे, गणेश शिरसाठ व इतर यांनी मागील भांडणाची कुरापत काढून सनी वर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले.

गुन्ह्याचा तपास करत असताना मयूर पठाडे व दादू पेखळे हे कोणार्क नगर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group