मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वत्र मतदानाची धावपळ पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर देशासहित राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
याचदम्यान, निवडणूक आयोगाने राज्यातील काही दिग्गज उमेदवारांना नोटीस धाडल्या आहेत. त्यात पंकजा मुंडे, हेमंत गोडसे, भास्कर भगरे आणि बजरंग सोनवणे यांचा सामावेश आहे. त्यानंतर आता आयोगाने आचारसंहितेच्या भंगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस पाठवल्या आहेत.