लोकसभेचा निकाल काय लागणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले  ....
लोकसभेचा निकाल काय लागणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले ....
img
Dipali Ghadwaje
नागपूर : राज्यातील लोकसभा निवडणुकांचे टप्पे संपले आहेत. आता देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. राज्यातील लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देशात कोणाची सत्ता येणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

विरोधकांकडून देशात त्यांचंच सरकार येणार असा दावा करत आहे. आता या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभेच्या निकालावर मोठं भाष्य केलं आहे.

यंदाही लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचले. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त फडणवीस भेटीसाठी आले. यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ४ जूनला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालावर मोठं भाष्य केलं आहे.

काय म्हणाले फडणवीस? 

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी पक्षातील कथित अंतर्गत वादाच्या आरोपावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमची चर्चा सुरु आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही'. विधानसभेच्या जागावाटपावर करताना फडणवीस म्हणाले, 'विधानसभा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे बसवून ठरवतील. भाजप मोठा पक्ष आहे. आम्हाला इतर पक्षाचा सन्मान राखून जास्त जागा मिळतील'.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group