मंत्रिपदाचा निर्णय खासदारांच्या मेरिटनुसार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंत्रिपदाचा निर्णय खासदारांच्या मेरिटनुसार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
Dipali Ghadwaje
मुंबई : दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राजकीय गोटात हालचाली वाढल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या खासदारांची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळणार आहे. 

त्यामुळे शिंदे गटाकडून कोणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार, याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. या मंत्रिपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे. तर काही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत. याचदरम्यान, मंत्रिपदाचा निर्णय मेरीटच्या आधारावर होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group