पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; सव्वा दोन मिनिटांत शोरूम साफ
पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; सव्वा दोन मिनिटांत शोरूम साफ
img
Dipali Ghadwaje
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सनीवेल इथं भारतीय मालकीच्या पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूमवर दिवसाढवळ्या दरोडा पडला आहे. तोंडाला मास्क लावून व हातात हातोडे घेऊन काळ्या कपड्यात आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या सव्वा दोन सेकंदात संपूर्ण शोरूम लुटून नेल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

१२ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा दरोडा पडला. या दरोड्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २० संशयित अचानक पीएनजीच्या शोरूममध्ये घुसले. काचेचे दरवाजे हातोड्यानं तोडून हे चोरटे घुसले. आत घुसल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी डिस्प्ले केस फोडायला सुरुवात केली. काही जण डिस्प्ले केस फोडत असताना बाकीचे लोक दागिने त्यांच्याकडी पिशव्यांमध्ये गोळा करत होते. अवघी २ मिनिटे १५ सेकंदात या चोरट्यांनी संपूर्ण शोरूम रिकामा केला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्याआधीच दागिन्यांसह इतर ऐवज घेऊन चोरटे वेगवेगळ्या गाड्यांमधून निसटले होते. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरोडेखोरांनी चालत्या वाहनातून काही दागिने टाकून दिले.

 भारतीय शोरूम याआधीही झालेत लक्ष्य

भारतीय मालकीच्या ज्वेलर्सवर दरोडा पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ४ मे रोजी सनीवेल येथील नितीन ज्वेलर्स आणि २९ मे रोजी नेवार्कमधील भिंडी ज्वेलर्स इथं अशाच प्रकारची दरोडा टाकण्यात आला होता. या तिन्ही चोऱ्यांची पद्धत एकच असल्यामुळं हे काम एकाच टोळीचं असल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. भारतीय शोरूमलाच का लक्ष्य केलं जात आहे याचाही शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group