काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी
काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी "या" नेत्याला उमेदवारी जाहीर
img
Jayshri Rajesh
विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार नक्की झाला आहे. काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. 

खासदार नागेश आष्टीकर यांचा "या" उमेदवारीला विरोध 

हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती. 

नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांचा दारुण पराभव केला होता. दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी लोकसभेत आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप आष्टीकर यांनी सातत्याने केला आहे. 

डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. 

प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत.  काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती
 
काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या उमेदवारीला पत्राद्वारे मंजूरी दिली होती. त्यांनंतर पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group