चंद्रपुरातील चेक बेरडी या छोट्याशा गावात बकरीच्या पोटी एका विचित्र पिल्लानं जन्म घेतला. या पिल्लाचा चेहरा हुबेहूब माणसासारखा होता. या विचित्र पिल्लाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्याला वाचवण्याचा प्रयत्न मालकांनी केला. मात्र आज सकाळी नऊच्या दरम्यान त्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण ?
चंद्रपुरातील चेकबिरडी गावात राहणाऱ्या मोतीराम आत्राम यांच्या मालकीच्या बकरीनं दोन पिल्लांना जन्म दिला. यातले पहिले पिल्लू दिसायला सर्वसामान्य पिल्लांसारखचं होते. पण दुसऱ्या पिल्लाला पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. या पिल्लाचे डोळे, चेहरा माणसासारखा होता.
या विचित्र पिल्लाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आत्राम यांच्या घरी गर्दी केली. या पिल्लाला वाचवण्यासाठी आत्राम यांच्या पत्नी छायात्रा आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले. मात्र या पिल्लाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खड्डा खणून पुरण्यात आला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विचित्र चेहरा असल्यामुळे पिल्लू गावात चर्चेचा विषय ठरले. त्याला पाहण्यासाठी अख्खा गाव जमला होता. त्याचे फोटो अल्पावधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा चमत्कार नसून जनुकीय बदलांच्या परिणाम असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.