मंत्रालयाच्या वारंवार फेऱ्या मारूनही काम होत नसल्यानं कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार , या मजल्यावरील एका खिडकीवर बसून हा व्यक्ती उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार जेव्हा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना समजला तेव्हा, त्यांनी त्याचं मन वळण्याचा प्रयत्न करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलंय.
नेमकं प्रकरण काय ?
मंत्रालयात अनेक चकरा मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद नारायण पाटील असे आहे. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार येऊन काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. कराड चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचं सांगण्यात येत आहे.