दीड लाखाची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस नाईकावर गुन्हा दाखल
दीड लाखाची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस नाईकावर गुन्हा दाखल
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दोन लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दीड लाखाची लाच मागितल्याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस नाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप चव्हाण असे लाच मागणार्‍या पोलीस नाईकाचे नाव आहे. त्यांची नेमणूक सध्या अहमदनगर येथील दहशतवादविरोधी पथकात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार  यांच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये  झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चव्हाण यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली.


ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव, मीरा आदमाने, पोलीस हवालदार संदीप वणवे, ज्योती शार्दूल व चालक पोलीस नाईक परशराम जाधव यांनी केली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group