पेठ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस ट्रकने चिरडले !   तिघे जागीच ठार,  एक गंभीर जखमी
पेठ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस ट्रकने चिरडले ! तिघे जागीच ठार, एक गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
पेठ  - नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ  जवळील हाॅटेल शिवमल्हार ढाब्या नजिक दि.(१९) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नाशिक रस्त्याने पेठ कडे जाणारी दुचाकीस गुजरात राज्याकडुन नाशिक कडे जाणारी अशोक लेलंड क्रमांक एम एच २८ बी बी ०१०७  यांची जोरदार धडक झाली या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे चिरडले जावुन जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला असुन त्यास अधिक  उपचारासाठी  नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या अपघातात दुचाकीवरील लहू सुदाम लिलके (१६) रा.कोचरगाव ता.दिंडोरी जि.नाशिक, कमलाकर नामदेव पानडगळे (२५) रा.भायगाव ता.पेठ, योगेश अरूण पानडगळे (१९) रा. भायगाव  ता.पेठ  जि.नाशिक हे जागीच ठार झाले दुचाकीवरील चौथा सागर शकंर  पानडगळे रा.भायगाव हा गंभीर जखमी झाला असुन त्यास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

सुदाम रामभाऊ लिलके रा.कोचरगाव याचे फिर्यादीवरून ट्रक चालक महमंद गौस एम अब्दुल जबरसाब रा. अरनरी ता.ओसपेठ जि.बल्लारी कर्नाटक राज्य याचे विरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद  करण्यात आला असून या बाबत पोलीस उपनिरीक्षक के एम दरगुडे पोहवा. डी आर डगळे रविंद्र तांदळे आदी अधिक तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group