श्रीकृष्ण जन्माष्टमीला शाळा सुरु राहणार की बंद? जाणून घ्या एका क्लिकवर
श्रीकृष्ण जन्माष्टमीला शाळा सुरु राहणार की बंद? जाणून घ्या एका क्लिकवर
img
दैनिक भ्रमर
उद्या  म्हणजेच 26 ऑगस्टला  सर्वत्र जन्माष्टमी तर 27 ऑगस्टला दहीहंडी साजरी केली जाईल.हिंदू धर्मातील  श्रीकृष्ण जन्माष्टमी हा महत्वाचा सण असून हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात विशेषत: मथुरेत जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथे मोठा उत्सव पाहायला मिळतो. अशावेळी भारतातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार की बंद?  अशा प्रश्न  अनेकांना पडला आहेत. 

 जन्माष्टमीचीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, तर  या दिवशी काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी देखील असते. यावर्षी जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त 26 आणि 27 ऑगस्ट या दोन्ही दिवशी येत आहेत्यामुळे तुमच्या शाळेत जन्माष्टमीची सुट्टी कधी आहे याबद्दल शाळेच्या शिक्षकांकडून खात्री करुन घ्या. विद्यार्थ्यांच्या शालेय डायरीमध्ये याची माहिती दिलेली असते. दरम्यान उत्तर प्रदेशातील शाळा 26 ऑगस्टलाच बंद राहतील.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भुनेश्वर, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला,श्रीनगर आदी ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल. त्यामुळे येथील शाळा बंद राहतील.  तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी सुट्टी नसेल. यामध्ये आगरतळा, बेलापूर, बेळगाव, बेंगळुरू, गुवाहाटी, भोपाळ, इंफाळ, इटानगर, कोची, कोहिमा, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, तिरुअनंतपुरम, पणजी या ठिकाणांचा समावेश आहे. काही ठिकाणी शाळा व्यवस्थापन सुट्टी देण्याबाबतचा निर्णयही घेऊ शकते. तेथे शाळा सुरू राहतील. यापैकी काही शहरांमध्ये जन्माष्टमीलाही शाळा बंद राहतात. 

बॅंका सुरु राहणार की बंद?

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी अनेक राज्यातील बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. याआधी शनिवार आणि रविवारीही बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group