प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 10 वर्षं पूर्ण ; तब्बल  ''इतक्या'' कोटी लोकांना मिळाला लाभ
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 10 वर्षं पूर्ण ; तब्बल ''इतक्या'' कोटी लोकांना मिळाला लाभ
img
दैनिक भ्रमर
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज, 28 ऑगस्ट 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची पहिल्यांदा शपथ घेतली, तेव्हा त्यांनी काही प्राधान्यक्रम ठरवले होते. त्यांपैकी एक म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग यंत्रणेत समाविष्ट करून घेणं. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री जन-धन योजना सरकारने सुरू केली. त्या योजनेमध्ये गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही बँकेत खातं उघडणं शक्य झालं आणि तेही झिरो बॅलन्स तत्त्वावर. त्यामुळे विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या थेट बँक खात्यात जमा करणं शक्य झालं.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 52.39 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली असून, मिनिमम बॅलन्स नसला तरीही सुलभपणे बँक खातं उघडणं या योजनेमुळे नागरिकांना शक्य झालं आहे. सरकारी डेटा असं सांगतो, की या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, योजनेचा प्रभाव व्यापक असल्याचं त्यावरून दिसून येतं.

प्रधानमंत्री जन धन योजनेला 10 वर्षं पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ सरकारने एक विशेष प्रश्नमंजूषा अर्थात क्विझ आयोजित केली आहे. या योजनेसंदर्भातल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन नागरिक बक्षिसं जिंकू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल त्यांच्या एक्स अकाउंटवरून माहिती दिली आहे.

28 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण दिवस नमो अॅपवर ही क्विझ सुरू असेल. जन-धन 10/10 चॅलेंज असं तिचं नाव असून, 10 साध्या-सोप्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना गव्हर्नन्सबद्दलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केलेलं पुस्तक जिंकण्याची संधी आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group