ऑफिसच्या कामाची वेळ संपली  तरीही बॉस चे फोन येतात ? वाचा काय आहे ''या''देशाचा नवीन कायदा
ऑफिसच्या कामाची वेळ संपली तरीही बॉस चे फोन येतात ? वाचा काय आहे ''या''देशाचा नवीन कायदा
img
दैनिक भ्रमर
ऑफिसच्या कामाची वेळ संपली तरीही सतत कामानिमित्त बॉस फोने करत असतात,सुट्टीचा दिवस असो अथवा ड्युटीचे तास संपवून घरी गेल्यानंतर किंवा रजेवर असताना ऑफिसमधून कामासाठी फोन येत असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. यामुळे अनेकदा आपण वातागून जातो पण नोकरीचा प्रश्न असल्याने एललायला हा त्रास सहन करण्या व्यतिरिक्त पर्याय नसतो . 

 पण आता ऑस्ट्रेलियातल्या कर्मचाऱ्यांना मात्र आता असा त्रास सहन करावा लागणार नाही. ऑस्ट्रेलियाने सोमवारी (26 ऑगस्ट) देशातल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राइट टू डिस्कनेक्ट’ नावाचा एक नावीन्यपूर्ण कायदा मंजूर केला आहे. या कायद्यामुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेनंतर आलेले बॉसचे ईमेल आणि फोन कॉलकडे दुर्लक्ष करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.

कोविड साथीमुळे काम आणि खासगी जीवन यांच्यातल्या सीमारेषा अस्पष्ट झाल्यामुळे सरकारने हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या सरकारने फेअर वर्क कायद्यात सुधारणा सादर केली आहे. आता ऑस्ट्रेलियातले कर्मचारी आणीबाणीची परिस्थिती वगळता इतर वेळी त्यांच्या कंपनीकडून आलेले फोन टाळू शकतात. ड्युटीवर नसताना ऑफिसमधलं काम मॉनिटर करण्यासाठी त्यांना भाग पाडलं जाऊ शकणार नाही.

ऑस्ट्रेलियन लोकसेवा आयोगाच्या नवीन नियमांवरच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे, की राइट टू डिस्कनेक्टनुसार एखादा कर्मचारी ड्युटीवर नसताना कामाशी संबंधित फोनला प्रतिसाद देणं टाळू शकतो किंवा कामाशी संबंधित मेल्स वाचून त्यांना प्रतिसाद देण्याचं टाळू शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group