पुरुषांच अस्तित्व धोक्यात? संशोधनातून  धक्कादायक खुलासा
पुरुषांच अस्तित्व धोक्यात? संशोधनातून धक्कादायक खुलासा
img
दैनिक भ्रमर
भविष्यात पुरुषांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे , नुकत्याच एका संशोधनातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे . या आधीच्या काही वर्षांपर्यंत  स्त्रियांच्या मानाने पुरुषांची संख्या जास्त होती . मात्र जगभरात आता हे चित्र बदलण्याची शकत्या आहे . 

कारण, नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार Y क्रोमोझोम (गुणसूत्र) नामशेष होत असल्याचं समोर आलं आहे. Y गुणसूत्र पुरुषाचं लिंग ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या संशोधनानुसार   भविष्यात मुलांची संख्या लक्षणीयरित्या कमी होईल. 

बहुतांश सस्तन प्राण्यांतील मादीच्या शरीरात दोन X गुणसूत्रं असतात तर नराच्या शरीरात एक X आणि एक Y गुणसूत्र असतं. मादीच्या शरीरात स्रीबीज आणि शुक्राणूंचा मिलाप झाल्यानंतर SRY जनुक तयार झालं तर तो गर्भ मुलाचा असतो. साधारणपणे गर्भधारणेच्या 12 आठवड्यांनंतर SRY जनुक सक्रिय होतं. यावरून गर्भात वाढणारं मूल मुलगी आहे की मुलगा हे लक्षात येतं. मेल हॉर्मोन असलेलं टेस्टोस्टेरॉन तयार करणारं बाळ मुलगा म्हणून जन्माला येतं.

माणूस आणि प्लॅटिपस वेगळे झाल्यापासून 166 मिलियन वर्षांमध्ये, Y गुणसूत्राने सक्रिय जनुकांची संख्या लक्षणीयरित्या गमावली आहे. ही संख्या 900 वरून 55 पर्यंत खाली घसरली आहे. एक मिलियन वर्षांमध्ये सुमारे पाच जनुकांचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. ही क्रिया अशीच सुरू राहिल्यास पुढील 11 मिलियन वर्षांत Y गुणसूत्र पूर्णपणे नाहीसं होऊ शकतं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group