गुजरातमधील पुराच्या पाण्यात अडकली भारताची स्टार फिरकीपटू
गुजरातमधील पुराच्या पाण्यात अडकली भारताची स्टार फिरकीपटू
img
दैनिक भ्रमर
गुजरातमधील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातून वाहणारी विश्वामित्री नदी तिचे किनारे तोडून वस्तीत घुसल्यानंतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पूर आला.

 गुजरातच्या या पूरस्थितीत भारताची स्टार फिरकीपटू राधा यादव  अडकली.  मात्र NDRF पथकाने तिची सुखरूप सुटका केली. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

फिरकीपटू राधा यादवने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम कथेद्वारे एक व्हिडिओ शेअर केला असून, ती 'अत्यंत वाईट परिस्थितीत' अडकली होती आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) तिची सुटका केली आहे. व्हिडिओमध्ये एनडीआरएफचे अधिकारी काही लोकांना बोटीवर घेऊन जाताना दिसत आहेत कारण इमारती, रस्ते आणि वाहने पाण्याखाली आहेत.

कोण आहे राधा यादव ?

राधा यादव ही भारतीय महिला क्रिकेटपट्टू असून ती भारतासाठी फिरकी गोलंदाज म्हणून खेळते. तिने १३ फेब्रुवारी २०१८ रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आत्ता पर्यंत एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये ४ सामन्यांमध्ये ४ तर ट्वेंटी -२० मध्ये ७७ सामन्यां मध्ये ८० विकेट घेतले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group