पुराच्या पाण्यात वाहून आलेली मगर अडकली घराच्या छतावर; वाचा कुठली आहे घटना
पुराच्या पाण्यात वाहून आलेली मगर अडकली घराच्या छतावर; वाचा कुठली आहे घटना
img
दैनिक भ्रमर
गुजरातमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून ,राज्यातील अनेक ठिकाणी रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे.

गुजरातमध्ये  पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.  यादरम्यान, अकोटा स्टेडियम परिसरात पाणी शिरले असून एका घराच्या छतावर मगर दिसल्याचा व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

गुजरातमध्ये काही दिवसांतच सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (एसईओसी) सांगितले की, सौराष्ट्र क्षेत्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर आणि राजकोटमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्याच्या पथकांच्या बचाव पथकाने वडोदरा शहराभोवती घरे आणि छतावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यासाठी भारतीय लष्कराच्या तीन तुकड्याही तैनात करण्यात आल्या.

दरम्यान , गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गेल्या तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. राजकोट, आनंद, मोरबी, खेडा, वडोदरा आणि द्वारका येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group