'हा'' मोठा नेता तुतारी हाथी घेणार ? विधानसभेच्या आधी अजित पवारांना धक्का !
'हा'' मोठा नेता तुतारी हाथी घेणार ? विधानसभेच्या आधी अजित पवारांना धक्का !
img
दैनिक भ्रमर
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे . महायुती पक्षांना सातत्याने राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. कागलमध्ये भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तुतारी हातात घेत आहेत. त्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी तसा इशारा पक्षाला दिला आहे.

फलटणमध्ये महायुतीत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहेत. फलटण येथे आज आयोजित केलेल्या एका बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.

“गल्लोगल्ली दहशत करणाऱ्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीला साथ देऊ नका. अन्यथा आम्ही तुतारी हातात घेऊ”, असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीतील वरिष्ठांना दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group