खुशखबर ! महाराष्ट्रातील ''या'' रेल्वे मार्गाला मोदी सरकारकडून मंजुरी
खुशखबर ! महाराष्ट्रातील ''या'' रेल्वे मार्गाला मोदी सरकारकडून मंजुरी
img
दैनिक भ्रमर

महाराष्ट्राला आता नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील शंभर वर्षांपेक्षा जुनी असलेल्या या  मागणीला  मंजूर मिळाल्याने महाराष्ट्रासाठी ही खुशखबर आहे. 

मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे. या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा-उत्पादकांना बाजारपेठ मिळणार आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे आणि मध्य प्रदेशातील बरवणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागांमध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी येईल. हा उपक्रम दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येईल.

मनमाड ते इंदूर या सुमारे 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी पहिले सर्वेक्षण 1908मध्ये झाले होते. त्यानंतर या रेल्वे मार्गांसाठी अनेक वेळा घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात रेल्वे मार्गाचे काम काही सुरु झाले नाही. 18,036 कोटींचा हा प्रकल्प सोमवारी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणारा हा मार्ग आहे.

कसा असणार रेल्वेमार्ग

  • मनमाड-मालेगाव-धुळे- नरडाणा-शिरपूर-सेंधवा आणि इंदूर असा सुमारे 309 किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग
  • मनमाड-इंदूर मार्ग 192 किलोमीटर महाराष्ट्रातून जाणार आहे.
  • मनमाड-इंदूर मार्गाचा 50 टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. उर्वरित खर्च महाराष्ट्र, मध्य प्रदेशने प्रत्येकी 25 टक्के करायचा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group